राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार शिक्षक सक्षमीकरण व गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती शासन निर्णय क्र. पीटीसी १०९६/ [१७३ /९६] /माशि-४, दि. ८ऑक्टोबर १९९६ मध्ये महाराणी ताराबाई शासकीय अभ्यापक महाविद्यालयाच्या (बी.टी.कॉलेज) इमारतीमध्ये करण्यात आली. सदर संस्था, शाहूपुरी ३ री गल्ली, कोल्हापूर -४१६००१ येथे आजाखेर कार्यरत आहे. दि. २७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णनुसार संस्थेची पुनर्रचना व बळकटीकरण करण्यासाठी संस्थेची कार्ये व विभाग यांचीही पुनर्रचना करण्यात आली आहे.






कोल्हापूर येथील डी.एड. कॉलेजचे अपग्रेडेशन करून १९९७ मध्ये डी.एड. कॉलेज, कोल्हापूर, जिल्हा कोल्हापूर येथे डाएटची स्थापना करण्यात आली. २०११ पर्यंत डी.एड. कॉलेजच्या जुन्या इमारतीत डाएट सुरू होते. २०११ मध्ये ते ५.२७ एकर क्षेत्रफळ असलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरित झाले.
District Institute of Education Copyright@2025. All Right Reserved. | Designed & Maintained by Sarvesh Technologies